Dum Aloo Recipe in Marathi
Dum Aloo Recipe in Marathi

दम आलू रेसिपी (Dum Aloo Recipe in Marathi) ही साधारणपणे दोन प्रकारे बनवतात . एक असते चमचमीत दम आलू रेसिपी आणि दुसरी सध्या पद्धतीची. आज आपण अशीच चमचमीत आणि उत्तम दम आलू रेसिपी बगणार (Dum Aloo Recipe) आहोत चला तर सुरु करूया.

दम आलू रेसिपी : Dum Aloo Recipe in Marathi

दम आलू बनवण्यासाठी साहित्य :-

  • छोट्या आकाराचे अर्धा किलो बटाटे
  • चिमुटभर हिंग
  • १/२ चमचा हळद
  • १ चमचा मिरची पावडर
  • १ मध्यम आकाराचा कांदा
  • २ कप दही
  • ४-५ तमालपत्राची  पाने
  • १ चमचा आलं ,लसुन पेस्ट
  • ४ चमचे तेल
  • १/२ कप दुध
  • मीठ चवीनुसार

मसाल्यासाठी :-

  • २ वेलदोडे
  • ७-८ मिरे
  • १ चमचा धने
  • १/४ चमचा शहाजिरे
  • ४-५ लवंगा
  • १ लहान दालचिनी

कृती :-

  • पहिला मसाल्याचे साहित्य मिक्सरमधून बारीक वाटून बाजूला ठेवावे .
  • बटाटे प्रथम धुवून बेताचे उकडून सोलावेत .
  • कढईत तेल तापवून सर्व बटाटे खमंग तळावेत व बाजूला ठेवावेत .
  • कढईत  बटाटे तळून  उरलेले तेल थोडे कमी करावे व उरलेल्या तेलात कांदा ,हिंग ,तमालपत्र आणि आलं लसुन पेस्ट घालून परतावे .
  • हे मिश्रण गुलाबी रंगावर परतला गेला की तेल सुटू लागते .
  • नंतर त्यात बारीक वाटून ठेवलेला मसाला मिक्स करून २-३ मिनिटे मध्यम आचेवर झाकून ठेवावे.
  • नंतर त्यात हळद ,मिरची पावडर आणि मीठ घालून परतावे .
  • नंतर तेल सुटायला लागले की गॅस मोठा करून दही आणि दुध घालून डावाने घोटावे .
  • मिश्रण जाड वाटल्यास थोडे उकळते पाणी घालून ढवळावे .
  • नंतर त्या मिश्रणात तळलेले बटाटे घालून परतावे .
  • सर्व मसाला बटाट्यांना सर्वत्र लागला पाहिजे .आणि गॅस बंद करून भाजीला दोन चांगल्या वाफा द्याव्यात.
  • आवडत असल्यास सजावटीसाठी कोंथिबीर घालून सर्व्ह करावे.
  • अशाप्रकारे दम आलू रेसिपी (Dum Aloo Recipe in Marathi) तयार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here