Dohale Jevan Ukhane

Published by Uma on

Dohale Jevan Marathi Ukhane
Baby Shower is known as Dohale Jevan in Marathi language. It is a celebration conducted for the expected child birth for the mother to be women. The function is generally conducted in the seventh month of the pregnancy. Family members and friends gather for the function to shower love, blessing and to be prepare for the motherhood. A swing is made and decorated with flowers. The mother to be lady sits on the swing and accept blessings.

The celebration conducted with different rituals and games. The function can not complete without taking name of husband in a small poetry, known as “Ukhane”. Here we have created a huge list of ukhane for baby shower. These Dohale Jevan special Ukhane will definitely make the celebration to remember for lifetime.

Liked it? Share with your friends…

Dohale Jevan Ukhane
1) रोज रोज दिवस नवा व अनुभवही नवा
…… ना अन् मला येणारया बाळराजांकरिता तुमचा आशीर्वाद हवा.

2) कुबेराच्या भांडारात हिरे-माणिकांच्या राशी, ….. रावांनी आणला शालू डोहाळे जेवणाच्या दिवशी.

3) चांदीच्या वाटीत रुपये ठेवले साठ, …..चे नाव घेते केला डोहाळ जेवणाचा थाट

4) मावळला सूर्य, उगवला शशी, …..चे नाव घेते डोहाळ जेवणाच्या दिवशी

Baby Shower Ukhane in Marathi

5) सासूबाई आहेत प्रेमळ, वन्सबाई आहेत हौशी, ……चे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी

6) हिमालयावर पडतो बर्फाचा पाऊस, ……चे नाव घेते सासरच्यांनी केली हौस

7) तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून डोळे माझे पाणावले, ……चे नाव गोड, पुरवा माझे डोहाळे

8) बाळराजांची चाहुल दरवळला परिसर, ….. च्या सहवासात माझे जीवन होईल सफल

Marathi Ukhane for Female for Baby Shower

9) घाट घातला तुम्ही पुरवायला माझे प्रेमळ डोहाळे, ….. च्या प्रेम झुल्यावर घेते मी हिंदोळे

10) संसारातल्या राजकुमाराची स्तुती स्तोत्रे गायला लागत नाही भाट
….. राव पाहतात आता बोबड्या बोलाची वाट

11) मोहरली माझी काया, लागता नवी चाहूल, ……चे नाव घेते आता जड झाले पाउल

12) पाच सुवासिनींनी भरली पाच फळांनी ओटी, ……चे नाव घेते तुम्हा सर्वांसाठी

Dohale Jevan Marathi Charolya

13) पहाटे वेलीवर फुलतात फुले गोमटी, ……चे नाव घेते भरली माझी ओटी

14) मायेच्या माहेरी डोहाळे-जेवणाचा घाट, ……चे नाव घेते, केला थाटमाट


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *