diet recipes in marathi- होममेड सलाड झटपट वजन करतील

193

फ्रुट सलाड ( Fruit salad )

झटपट वजन कमी करायचं असेल तर फ्रुट सलाड एक अशी रेसिपी (recipes)आहे, जी फार हेल्दी असते. आणि आपण वजन कमी करण्यासाठी म्हणून सलाड चा वापर करतो पण त्यातून आपल वजन च कमी होत नाही, तर आपल्या शरीराला पोषक तत्त्व भेटतात म्हणून खूप वेळेस डॉक्टर आपल्याला फ्रुट सलाड खायला सांगतात तसेच यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन्स यांसारखी अनेक पोषक तत्त्व असतात. अनेकदा वेट लॉस डाएटमध्ये फळांचा समावेश करण्याचा सल्ला देण्यात येतो. अशातच फ्रुट सलाडही वेट लॉस डाएटमध्ये अत्यंत फायदेशीर ठरतं. 

फ्रुट सलाड करण्यासाठी लागणारी सामग्री खालीलप्रमाणे आहे.

साहित्य : 

 • सफरचंद (सर्व फळांच्या फोडी करणं)
 • डाळिंब 
 • अननस
 • स्ट्रॉबेरी 
 • फॅट्स नसलेलं दही 

कृती : 

1)वर सांगण्यात आलेलं सर्व साहित्य एका बाउलमध्ये एकत्र करून घ्या.

2)तुम्ही यामध्ये पिस्ता, अक्रोड, बदाम यांपैकी कोणत्याही ड्रायफ्रुट्सचा वापर करू शकता. 

3)एका तासासाठी फ्रिजमध्ये ठेवा आणि त्यानंतर सहज सोपी सलाड  रेसिपीचा डाएटमध्ये समावेश करा. 

चण्याचं सलाड 

चण्यामध्ये प्रोटीन, मॅगनिज आणि डायट्री फायबर असतं. जे दुपारच्या लंचसाठी अत्यंत उत्तम ठरतं. जाणून घेऊया चण्याचं सलाड तयार करण्याची रेसिपी… 

साहित्य : 

 • उकडलेले चणे 
 • छोट्या तुकड्यांमध्ये कापलेली काकडी 
 • कांदा
 • टोमॅटो
 • कोथिंबीरीची चटणी
 • लिंबाचा रस 
 • काळई मिरी पावडर 
 • जीरा पावडर 

कृती : 

1) चणे उकडल्यानंतर एका बाउलमध्ये ठेवा. 

2)आता यामध्ये लिंबू आणि चटणी व्यवस्थित एकत्र करून घ्या.

3)आता मिश्रणामध्ये काळी मिरी पावडर आणि जिरा पावडर चवीनुसार एकत्र करा. त्यामध्ये बारिक चिरलेली कोथिंबीर एकत्र करा. 

टिप : प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here