रेसिपी – डाळवडे : Dalvade Recipe in Marathi

Published by Uma on

Dalvade Recipe in Marathi

रेसिपी – डाळवडे : Dalvade Recipe in Marathi

साहित्य :

 • १ वाटी हरभरा डाळ
 • ५ ते ६ हिरव्या मिरच्या
 • ८ ते १० लसूण पाकळ्या
 • १ इंच आले
 • १/२ टि. हळद
 • १ टि. जीरे
 • १ टि. तीळ
 • कढीपत्त्याची पाने
 • कोथिंबीर बारीक चिरुन
 • तेल
 • मीठ

पाककृती –


• हरभरा डाळ धुवून २ ते ४ तास भिजवावी. या भिजलेल्या डाळीतून पाणी नीट निथळू द्यावे.

• यानंतर, हिरव्या मिरच्या, आले, लसूण, कढीपत्ता, मीठ एकत्र करुन मिक्सरमध्ये थोडे अर्धवट बारीक करुन घ्यावे. डाळ देखील अशीच बारीक करुन घ्यावी.

• भांड्यात वाटलेली डाळ काढून घ्यावी. त्यामध्ये मिरची पेस्ट व चवीनुसार मीठ, चिरलेली कोथिंबीर, हळद, जिरे घालून मिश्रण नीट एकजीव करावे.

• प्लॅस्टिक पेपरवर जरासे तेल लावून, त्यावर जाडसर वडा थापावा. गरम तेलात मध्यम आचेवर डाळवडे तळून घ्यावेत.

• गरमागरम वडे तिखट हिरव्या किंवा चिंचेच्या आंबटगोड चटणी सोबत सर्व्ह करावेत.

तुम्हाला डाळवड्यांची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा, तुमच्या प्रतिक्रिया लिहा खालील कमेन्टबॉक्समध्ये!


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *