Skip to content

खिचडी कशी बनवायची – Dal Khichdi Recipe in Marathi

Dal Khichdi Recipe in Marathi : डाळ खिचडी

आज आपण डाळ खिचडी (Dal Khichdi) कशी बनवायची ते बगणार आहोत.हळूहळू थंडी वाढायला लागली कि आपल्याला काही तरी गरमागरम सूप किंवा खिचडी खायची इच्छा होते.खिचडी हा पटकन होणारा आणि चवीला उत्तम लागणार प्रकार आहे. पण खिचडी हा प्रकार प्रत्येक भागात वेगवेगळा बनवला जातो .जसे खान्देशात खिचडी हि कढी सोबत खातात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी खिचडी बनवतात कोणी डाळ खिचडी बनवत, कोणी साधी खिचडी तर कोणी फक्त तूर डाळ घालून बनवत.

खिचडीला राष्ट्रीय मान्यता मिळावी म्हणून बरेसचे लोक प्रयत्न करताय .आपण घरी खिचडी बनवतो पण त्याची चव हि डाब्यावर मिळणाऱ्या डाळ खिचडी सारखी नसते.तर आज त्याच पद्धतीने घरी डाळ खिचडी कशी बनवायची याची खास रेसिपी (Dal Khichdi Recipe in Marathi) आपण बगणार आहोत .चला तर मग सुरवात करूया आजच्या आपल्या तडक्यावाल्या डाळ खिचडीला (Dal Khichdi Tadka).

साहित्य : Ingredients For Dal Khichdi in Mararthi

 • अर्धा कप तांदूळ
 • ३ चमचा तूर डाळ
 • १ चमचा हळद
 • हिंग
 • १ चमचा मीठ
 • २ कांदे (बारीक चिरून )
 • १ टमाटर (बारीक चिरून )
 • १ चमचा मोहरी
 • १ चमचा जिरे
 • १ चमचा लाल तिखट
 • १ चमचा धने पूड
 • १ चमचा आलं लसूण पेस्ट

फोडणीसाठी: Dal Tadka In Marathi

 • २ चमचा तूप
 • १ चमचा जिरे
 • ७-८ कढीपत्ता पाने
 • ३-४ लाल सुक्या मिरच्या

कृती : खिचडी कशी बनवायची

1) सगळ्यात आधी डाळ खिचडी बनून घेण्यासाठी आपल्याला भात शिजून घ्यायचाय.तुम्ही डाळ खिचडी बनवण्यासाठी तुकडा तांदूळ पण वापरू शकता.आज आपण डाळ खिचडी बनवण्यासाठी बासमती तुकडा वापरनार आहोत, त्याची मस्त मऊ आणि लुसलुशीत खिचडी होते.

2) आपण भात कुकर मध्ये शिजवणार आहोत,त्यासाठी कुकर मध्ये अर्धा कप तांदूळ घ्यायचेत.लगेच त्यात मध्यम आकाराच्या चमच्याच्या साहाय्याने ३ चमचा तूर डाळ घालायची.तूर डाळ ऐवजी तुम्ही मुगाची डाळ वापरू शकता. किंवा अर्ध्या अर्ध्या प्रमाणात तूर डाळ आणि मूग डाळ वापरू शकता .

3) त्यानंतर आता डाळ आणि तांदूळ स्वछ धुऊन काढायचेत.तांदूळ धुऊन झाले कि त्यात पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घाला .

4) आपले तांदूळ जेव्हडे आहेत त्याच्या तीनपट आपल्याला त्यात पाणी घालायचं. पाणी घालून झालं कि त्यात एक चमचा मीठ टाकायचय.आता हा भात आपल्याला मध्यम आचेवर ३-४ शिट्या होईपर्यंत शिजवायचं.

5) भात शिजून होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया,त्यासाठी गॅसवर पॅन ठेवा.त्यात ३ चमचा तेल टाका.तेल गरम झालं कि त्यात एक चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली कि त्यात बारीक चिरलेला कांदा घाला कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतायचं.

6) कांदा सोनेरी होत आला कि त्यात बारीक चिरलेला टमाटर घाला.आता ह्याच वेळेत आपल्याला एक एक करून सगळ्या वस्तू टाकायच्यात.टोमॅटो टाकून झालं कि त्यात एक चमचा अद्रक लहसून पेस्ट टाका त्यानंतर एक चमचा लाल तिखट ,धने पूड घाला. आता हे सगळं मिसळून घ्यायचं आणि ३-४ मिनिटे टमाटर मऊ होईपर्यंत शिजवायचं.

7) आता आपला भात शिजला असेल, तो खाली उतरून चांगला मिक्स करून घ्यायचा त्यात थोडं पाणी घालून पातळ करायचा.

8) आता आपण तयार केलेल्या फोडणीत हा भात घाला.चांगला एकत्र करून घ्या आणि ३-४ मिनिटे गॅसवर ठेवा.

9) डाळ खिचडी अजून जास्त खमंग होण्यासाठी आपण त्यावर फोडणी (Dal Khichdi Tadka) घालणार आहोत.त्यासाठी एका छोट्या फोडणीच्या कढईत २ चमचा तूप घ्यायचं त्यात एक चमचा जिरे घालायचे ,त्यानंतर ७-८ कडीपत्ता पाने घालायचे नंतर ५,६ सुक्या लाल मिरच्या टाका .

आता हि फोडणी आलं खिचडीवर टाका.अशाप्रकारे आपली गरमागरम डाळ खिचडी (Dal Khichdi Recipe in Marathi) खायला तयार आहे . तुम्ही मस्त पापड,लोणचं सोबत मस्त आस्वाद घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *