Dahi Vade Recipe in Marathi
Dahi Vade Recipe in Marathi

दही-वडे रेसीपी : Dahi Vade Recipe in Marathi

साहित्य :

  • पाउण कप उडदाची डाळ
  • १/४ कप ओल्या खोब-याचे पातळ तुकडे
  • ४-५ मिरं, २ कप पातळ ताक
  • दीड कप दही
  • ५-६ टे.स्पू. साखर
  • मिरपूड
  • लाल तिखट
  • चाट मसाला
  • मीठ,
  • तळण्यासाठी तेल

पाककृती :

१) (वडे)- उडीद डाळ पाण्यात ४-५ तास भिजत घालावी. नंतर, त्यामधील अगदी थोडेसेच पाणी घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी. वाटलेले मिश्रण थोडे दाटसर करावे, नंतर त्यात मीठ, ठेचलेले मिरे आणि खोब-याचे पातळ काप घालावेत.

२) वडे मध्यम आचेवर गोल आकारात तळून घ्यावेत. काहीवेळेस वडे आतून कच्चे राहतात, म्हणून वड्यांचा आकार मोठा ठेवू नये.

३) (ताक)-  पातळ ताकात थोडी साखर आणि चवीपुरते मीठ घालून, तळलेले वडे त्यामध्ये साधारण अर्धा ते एक तास बुडवून ठेवावेत. तोपर्यंत वरुन घालावयाचे दही तयार करुन घ्यावे.

४) (दही)- वाडग्यात थोडे दही घेऊन, ते रवीने घुसळून त्यामध्ये पाणी घालून दह्यास आवश्यक तितका पातळपणा द्यावा. आवडीनुसार साखर व चवीस थोडे मीठ घालून हे मिश्रण थोडावेळ फ्रिजमध्ये गार होण्यास ठेवावे.

५) नंतर, ताकात भिजवलेले वडे प्लेटमध्ये घेऊन, त्यावर दह्यासोबत वरुन चाट मसाला, मिरपूड, व लाल तिखट घालून डिश सर्व्ह करावी.

मैत्रिणींनो! वरील, ‘दही-वडे’ रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा खालील कमेन्टबॉक्सद्वारे!

दही-वडे रेसीपी : Dahi Vade Recipe in English

Ingredients :

  • One pound cup of urad dal
  • Thin pieces of 1/4 cup wet beans
  • 4-5 peppers, 2 cups buttermilk
  • One and a half cup of yogurt
  • 5-6 tsp. Sugar
  • Pepper
  • Red chili
  • Chaat masala
  • Salt,
  • Oil for frying

How To Make Dahi Vade Recipe in Marathi :

1) (Wade) – Soak urad dal in water for 4-5 hours. Then, take a little bit of water and grind it in a mixer. Make the mixture a little thicker, then add salt, crushed peas and thin slices of beans.

2) Fry Vada on medium heat in round shape. Sometimes the sticks stay raw on the inside, so the size of the sticks should not be kept large.

3) (Buttermilk) – Add a little sugar and salt to taste. Until then, make yoghurt to be added on top.

4) (Yogurt) – Take some yoghurt in a bowl, rub it with ravi, add water in it and give yoghurt as much thinness as required. Add sugar and a pinch of salt to your liking and let it cool in the fridge for a while.

5) Then take the soaked wada in a plate, serve it with curd, chaat masala, black pepper and red chili powder

Friends! Above, tell us exactly how you felt about the ‘Dahi-Wade’ recipe through the comment box below!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here