मक्याचे पिठाची कांदा भजी : Corn Flour Pakoda Recipe in Marathi

Published by Uma on

मक्याचे पिठाची कांदा भजी

पावसाळा म्हंटल कि आपल्या सर्वाना पटकन आठवण होते ती कांदा भजी ,चहा यांची. पावसाच्या थंडगार गारव्यात भजी आपल्याला सुखावुन टाकतात.पण नेहमी आपण चहा बरोबर कांदा भजी बनवत आलोय आणि त्याचीच सवय आपल्याला झाली , पण आज आपण एका वेगळ्या भजीचा आस्वाद घेणार आहोत.अगदी कांदा भजीपेक्षाही चविष्ट आणि कुरकुरीत. अक्षरशः पोट भरेल पण मन भरणार नाही.चला तर सुरवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला मक्याचे पिठाची कांदा भजी(Corn Flour Pakoda Recipe in Marathi).

मक्याचे पिठाची कांदा भजी : Corn Flour Pakoda Recipe in Marathi

साहित्य :

 • २ वाट्या मक्याचे पीठ
 • ४-५ मोठे कांदे
 • ४ टेबलस्पून तांदळाची पिठी
 • २ चमचे तिखट
 • १\२ चमचा हळद
 • १\२ चमचा ओवा
 • चवीनुसार मीठ
 • २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
 • कोथिंबीर बारीक चिरून
 • भजी तळण्याकरता तेल

कृती :

 1. मक्याच्या पिठाची कांडा भजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी कांदे पातळ उभे उभे चिरून घ्यावेत.
 2. आता त्या चिरलेल्या कांद्यावर मक्याचे पीठ, तांदळाचे पिठी, हळद,ओवा,मीठ,तिखट घालून हलक्या हाताने मिसळून घ्यावे.
 3. त्यात आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
 4. भजी तळण्यासाठी कढईत तेल तापत ठेवावे.
 5. तेल चांगले गरम झाले कि तापलेल्या तेलात कांदा मोकळा करून वेड्या वाकड्या आकाराची भजी सोडावीत व छान खरपूस टाळून घ्यावीत.
 6. छान खरपूस भजी गरमागरम खायला द्यावीत.

टीप :

 • भजी जरा झणझणित आवडत असल्यास २-३ मिरच्या बारीक चिरून घालाव्यात.
 • भजी गरमा गरम खायला द्या. थंड झाल्यास मऊ पडतात.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *