Chicken Biryani Recipe in Marathi । How to make chicken biryani – चिकन बिर्याणी रेसिपी
चिकन बिर्याणी रेसिपी chicken Biryani Recipe : बिर्याणी म्हंटल तर तोंडाला पाणी आणून देणारी रेसिपी. चिकन बिर्याणी chicken Biryani ने भरलेले ताट आपल्या समोर असेल तर आपण खाण्याचा मोह नाही आवरू शकत. चिकन बिर्याणी chicken biryani recipe हा एक लोकप्रिय पदार्थ आहे अगदी डिनर पार्ट्यापासून ते रविवारच्या खास जेवणापर्यंत आपल्याला बिर्याणी कधी पण खायला आवडते.मांसाहारी लोकांना तर सणाला पण बिर्याणी फार आवडते ते सर्व प्रसंगांना अनुकूल ठरते. चिकन बिर्याणी chicken biryani भारतात नाही तर जगभरात लोकप्रिय आहे लोक चिकन बिर्याणी फार आवडीने खातात. असं म्हणतात मोगलांनी चिकन बिर्याणीची ओळख भारतात आणली आणि इस्लामिक संस्कृतीतली सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी चिकन बिर्याणी chicken biryani हा एक आहे.
चिकन बिर्याणी काय आहे – What is chicken biryani
Chiken biryani recipe । चिकन बिर्याणी
सुगंधीत मसाले आणि औषधी वनस्पती चवदार तांदळाचा ,आणि चिकन यांना योग्य पद्धतीने वापरून तयार केलेली पाककृती म्हणजे चिकन बिर्याणी . दक्षिणेमध्येही बिर्याणीचे अनेक प्रकार सापडतात, असा विश्वास आहे की येथे चिकन बिर्याणी ची अरबांद्वारे ओळख झाली.
जर आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकले तर एखाद्यास बिर्याणीचे असंख्य प्रकार सापडतील. दम चिकन बिर्याणी (chicken biryani)पासून ते हैदराबादी चिकन बिर्याणी पर्यंत.
आज आपण अगदी सोप्प्या पद्धतीने चिकन बिर्याणी chicken biryani recipe बनवणार आहोत जी बनवायला जास्त वेळ नाही लागत आणि अगदी कमी साहित्यात चवदार बिर्याणी आपण बनवू शकतो ,तर चला मग बगूया चिकन बिर्याणी रेसिपी.तुमच्या घरी तुम्ही नक्की एकदा करून बगा .नक्कीच तुम्ही घरच्यांची ह्रदये जिंकल्याशिवाय राहणार नाही आहे.
चला तर बगूया कशी बनवायची चिकन बिर्याणी पाककृती chicken biryani recipe सर्वात प्रथम आपण चिकन शिजून घेण्यासाठी लागणारे साहित्य बगूया.
चिकन शिजवण्यासाठी लागणारे साहित्य : Ingredients for chicken biryani recipe fry
५०० ग्राम चिकन
२ कांदे (बारीक चिरलेला)
आले लसून पेस्ट
१ चमचा हळद
चवीनुसार मीठ
चिकन बिर्याणी साठी लागणारे साहित्य : Ingredients for chicken biryani recipe
Chicken biryani recipe in marathi – चिकन बिर्याणी
५०० ग्रॅम लांब दाणेदार बासमती तांदूळ
हिरवी मिरची पेस्ट
४,५ कांदे (उभे चिरून घ्या)
५ लवंग
५ मिरे
१ तमालपत्र (तेजपत्ता)
१ चमचा शाही जीरा
२ हिरवी इलायची
१ दालचिनी
कोथिंबीर ( बारीक चिरून घ्यावी)
१/4 चमचा हळद
धना पावडर
गरम मसाला ( आवडीनुसार दुसरा पण मसाला वापरू शकता उदा: अंबारी, कांदा लसूण.)
चिकन बिर्याणी कशी बनवायची -How to make chicken biryani recipe in marathi
- चिकन बिर्याणी रेसिपी (chicken biryani recipe) बनवण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम चिकन शिजून घ्यायचं आहे.
- चला तर मग आपण चिकन शिजवून घेऊया .त्यासाठी गॅसवर पॅन ठेवा त्या पॅनमध्ये 2 चमचा तेल टाका तेल चांगलं गरम होऊ द्या मग त्यात बारीक चिरलेला कांदा घाला .कांदा चांगला झाला की त्यात आले लसूण पेस्ट टाका मग त्यात हळद आणि मीठ घाला एकत्र मिसळावा आता त्यात चिकन टाका पूर्ण वेवस्तीत एकत्र करून घ्या आणि त्यावर झाकण ठेवून द्या.
- थोड्या थोड्या वेळाने बगत राहा म्हणजे चिकन करपणार नाही .चिकन शिजून होई पर्यंत तांदूळ स्वछ धुवा आणि त्याला अर्धा तास भिजु द्या.
- आता आपण चिकन बिर्याणी करायला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही कुकर वापरू शकता .आता गॅस वर कुकर ठेवा त्यात २ चमचे तेल घाला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुप पण वापरू शकता आता तेल चांगले गरम झाले की त्यात उभा चिरलेला कांदा टाका कांदा चांगला सोनेरी झाला की त्यात आपण घेतलेले गरम मसाले घाला.
- गरम मसाल्यांचा छान वास यायला लागला की त्यात हिरवी मिरची पेस्ट घाला आणि चांगले हलून घ्या .
- आता त्यात हळद, धना पावडर टाका चवीनुसार मीठ टाका.पूर्ण साहित्य टाकून झालं की तांदूळ टाका आणि अंदाजानुसार पाणी टाकून पाण्याला उकळी येऊ द्या.
- पाण्याला उकळी आली की आपण चिकन बिर्याणी च्या रेसिपीसाठी (chicken biryani recipe) शिजवलेलं चिकन त्यात टाका चिकन आणि तांदूळ एकत्र करून घ्या त्यावर बारीक चिरलेली कोथमबीर घाला आणि कुकरच झाकण लावून घ्या.
- गॅस मध्यम आचेवर ठेवा २,३शिट्या झाल्या की गॅस बंद करा .कुकरच झाकण लगेच खोलू नका वाफेवर बिर्याणी अजून जास्त चांगल्या पद्धतीने शिजते.
- कुकर थंड झाले कि गरमागरम चिकन बिर्याणीचा आस्वाद तुम्ही काकडी ,कांद्या सोबत मनसोक्त घेऊ शकता.
- अश्या प्रकारे आपली सोप्या पद्धतीची चिकन बिर्याणी रेसिपी chicken biryani recipe तयार आहे.