Chapati Sandwich – Breakfast Recipe in Marathi चपाती सँडविच

Published by Uma on

breakfast recipes : chapati Sandwich चपाती सँडविच

बायकांना सकाळी उठल्यानंतर दररोज पडणारा प्रश्न म्हणजे सकाळचा नास्ता ( Breakfast Marathi Recipes ) काय बनवायचा? दररोज तोच तोच नास्ता पोहे, उपमा खाऊन कंटाळा आलेला असतो अशा वेळेस नेमकं काय बनवायचं समजत नाही त्यावर चांगला पर्याय म्हणून आज आपण सोपी आणि झटपट आगळी वेगळी रेसिपी ( Chapati Sandwich Breakfast recipes in Marathi) बगणार आहोत.

breakfast recipes : chapati Sandwich (चपाती सँडविच)

रात्री उरलेल्या पोळ्या पासून एक चटपटीत नास्ता आपण बनवू शकतो तो म्हणजे चपाती सँडविच ( chapati Sandwich in Marathi ) आपण चपाती सँडविच एक स्नॅक (snack) म्हणून पण खाऊ शकतो तर लगेच आपण सुरवात करूया चपाती सँडविच बनवन्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे आहे.

साहित्य : Chapati Sandwich Breakfast Ingredients

उरलेला चपाती

1 उकडलेले आणि मॅश केलेले बटाटा

१/4 कप बारीक चिरलेला कांदा

मोझरेला चीज

१ टीस्पून बारीक चिरून हिरवी मिरची

एक चिमूटभर हिंग

१/4 टीस्पून हळद

१ चमचा आले-लसूण पेस्ट

१/4 टीस्पून जिरे

२ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर

चवीनुसार मीठ

1 टेस्पून अंडयातील बलक

२ टिस्पून तेल

मिरची सॉस (पर्यायी)

तूप

चपाती सँडविच बनवण्याची पद्धत -Chapati Sandwich Breakfast recipes Steps

 • सर्वप्रथम एका कढईत तेल गरम करा.
 • त्यात फोडणीसाठी जिरे घाला आणि फोडणी द्या.
 • त्यात नंतर हिंग व बारीक चिरलेला कांदा घाला आणि साधारण -5 मिनिटे मध्यम आचेवर होऊ द्या.
 • कांदा चांगला सोनेरी होऊ लागला की त्यात आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, हळद घाला आणि चांगले मिक्स करन घ्या.
 • हे मिश्रण चांगले एकजीव झाले की गॅस बंद करा .
 • त्या मिश्रणात आता मॅश केलेले बटाटे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ घाला आणि चांगले मिक्स करून घ्या. आता स्टफिंग तयार आहे.
 • आता मध्यम आचेवर तवा गरम करा.
 • त्या तव्यावर थोडे तूप पसरवा आणि त्यावर चपाती घाला.
 • चपाती एका  बाजूने चांगली कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
 • चपाती एकाच बाजूने भाजून घ्या चांगली भाजली कि प्लेटमध्ये उतरून घ्या.
 • त्यावर अंडयातील बलक पसरवा.
 • अंडयातील बलकांऐवजी तुम्ही चिंचेची चटणी, हिरवी चटणी किंवा दही वापरू शकता.
 • तुम्हाला आवडत असल्यास थोडा मिरची सॉस पसरवा.
 • मिरची सॉस पर्यायी आहे. तुम्हाला आवडत नासेल तर तुम्ही नका लावू
 • तुम्ही मिरची सॉसऐवजी केचअप वापरू शकता.
 • एका चपातीला हे लावून झालं की दुसर्‍या चपातीसाठीही तीच प्रक्रिया पुन्हा करा.
 • चपातीवर स्टफिंग घाला आणि चांगले पसरवा.
 • चपातीला लावलेल्या स्टफिंगला थोडेसे दाबा जेणेकरून ते चपातीवर चांगले चिकटेल.
 • नंतर त्यावर चीज पसरवा तुम्हाला पनीर आवडत असेल तर तुम्ही चीज ऐवजी पनीर पण वापरू शकता
 • आता त्या स्टेफिग लावलेल्या चपातीला दुसर्‍या चपातीने झाकून ठेवा.
 • मध्यम आचेवर तवा गरम करा.
 • त्यावर तूप घाला. तुपाऐवजी तुम्ही लोणी वापरू शकता.
 • पॅनवर तयार झालेले चपातीचे सँडविच ठेवा दोन्ही बाजूंनी सँडविच चांगले होऊ द्या
 • दुसर्‍या बाजूनेही चांगले टोस्ट करा
 • आता तयार झालेले सँडविच एका डिशमध्ये घ्या.
 • त्याचे 4 तुकडे करून सर्व्ह करावे


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *