चना चिली रेसिपी : Chana Chili Recipe in Marathi & English

Published by Uma on

Chana Chili Recipe

चना चिली रेसिपी (Chana Chili Recipe in Marathi & English ) : चटपटीत कुरकुरीत चना चिली रेसिपी कशी बनवायची ? तर अगदी सोप्प आहे हि रेसिपी बगुन तुम्ही अतिशय चवदार आणि हॉटेल सारखी घरच्या घरी चना चिली रेसिपी बनवू शकता चला तर सुरवात करूया.

चना चिली रेसिपी : Chana Chili Recipe in Marathi

साहित्य :

 • १ कप चणे(रात्रभर भिजत घालावेत)
 • १ लसूण गड्डा
 • १ मोठा कांदा
 • २ मध्यम आकाराच्या शिमला मिरच्या
 • ४ ते ५ हिरव्या मिरच्या
 • २ कांद्याच्या पाती
 • ४ चमचे टॉमेटो सॉस
 • ४ चमचे रेड चिली सॉस
 • ३ चमचे सोया सॉस
 • ३ चमचे व्हिनेगर
 • २ चमचे काळीमिरी पावडर
 • ४ ते ५ चमचे कॉर्नफ्लॉवर
 • तेल आवश्यकतेनुसार
 • मीठ आवश्यकतेनुसार

कृती :

१) रात्रभर भिजवून घेतलेले चणे, कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. (चणे संपूर्ण मऊसूद शिजवू नयेत.) शिजवलेल्या चण्यातील पाणी निथळून द्यावे. त्यामध्ये एक लहान चमचा काळीमिरी व मीठ घालून नीट घलवून घ्यावे.

२) आता, त्यात कॉर्नफ्लॉवर घालावा व सर्व चण्यांना कॉर्नफ्लॉवर समसमान लागेल याची काळजी घ्यावी.

३) कढईत तेल गरम करुन थोडे थोडे चणे तळून घ्यावेत.(चणे फुटून तेल उडण्याची शक्यता असते, त्यामुळे मध्यम आचेवर चणे तळून घ्यावेत.) चणे तळून झाल्यावर गार होण्यास बाजूला सारुन ठेवावेत.

४) आता, कढईत ३ ते ४ चमचे तेल गरम करुन बारीक चिरेलला लसून परतून घ्यावा.

५) यामध्ये चिरलेला कांदा टाकून पुन्हा परतून घ्यावे. आता, त्यात चिरलेली शिमला मिरची व पातीकांदा (कांद्यासहित) टाकून छान परतून घ्यावा.

६) नंतर, यात उभ्या चिरलेल्या मिरच्या व सोया सॉस, टॉमेटो सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर, जराशी मिरीपूड घालून सर्व मिश्रण नीट एकजीव होईस्तोवर परतावे.

७) तयार मिश्रणात, तळून घेतलेले चणे घालावेत व मंद आचेवर सर्व मिश्रण नीट ढवळून घ्यावे. आता, चवीनुसार त्यामध्ये मीठ घालावे व कढईवर झाकण देईन गॅस बंद करावा.

८) अशी तयार डीश गरमा गरम सर्व्ह करावी. फ्राईड राईस किंवा अगदी जिरा राईस सोबतही तोंडी लावायला उत्तम ठरणारी ‘चना चिली’ नक्की ट्राय करुन पाहा व आठवणीने कळवा प्रतिक्रिया खालील कमेन्टबॉक्समध्ये.

Chana Chili Recipe in English : चना चिली रेसिपी

Ingredients :

 • 1 cup gram (soak overnight)
 • 1 clove of garlic
 • 1 large onion
 • 2 medium sized Shimla Chilies
 • 4 to 5 green chillies
 • 2 onion leaves
 • 4 tablespoons tomato sauce
 • 4 tablespoons red chili sauce
 • 3 tablespoons soy sauce
 • 3 tablespoons vinegar
 • 2 tbsp black pepper powder
 • 4 to 5 tablespoons cornflower
 • Oil as needed
 • Salt as needed

How To Make Chana Chili Recipe

१) Cook the soaked gram in the cooker overnight. (Do not cook whole gram flour.) Drain the water from the cooked gram. Add a teaspoon of black pepper and salt and mix well.

२) Now add cornflower and make sure that all the chickpeas have the same amount of cornflower.

३) Heat oil in a pan and fry chickpeas little by little.(Chickpeas are likely to burst and oil will fly away, so fry chickpeas over medium heat.)

४)Now heat 3 to 4 tbsp oil in a pan and fry finely chopped garlic.

५)Add chopped onion and saute again. Now add chopped capsicum, chilli and onion and saut.

६)Then add chopped chillies and soy sauce, tomato sauce, red chili sauce, vinegar, chilli powder and saute till all the mixture is well mixed.

७)In the prepared mixture, add fried gram and stir over low heat. Now, add salt to taste and cover the pan and turn off the heat.

८)Serve hot. Be sure to try ‘Chana Chili’ which is best to make orally with fried rice or even cumin rice and remember the feedback in the comment box below


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *