Chakli recipe in marathi | quick and easy chakli tips – कुरकुरीत खमंग चकली

कुरकुरीत खमंग चकली रेसिपी – chakli recipe in marathi

चकली (chakli recipe) हा भारतातील पारंपरिक पदार्था पैकी एक आहे.तशेच चकली हा मराठी पदार्थ आहे जो महाराष्ट्रात विशेषकरून दीपावलीला बनवण्यात येतो चकली हा पदार्थ विविध पिठाच्या भाजणीपासून तयार करण्यात येतो ती भाजणी तांदूळ, गहू ,उडीद याच्या पासून तयार करतात काही ठिकाणी चकली हि मैद्याची असते हि चकली पण चवीला छान लागते

चकली हि दिसायला गोल आणि चव मध्ये कुरकुरीत लागते,म्हणून सगळे जण चकली आवडीने खातात.आपण सगळे चकली अल्पाहार (नास्ता) म्हणून खात असतो.सर्वसाधारणपणे चकली आपण दिवाळी सारख्या सणांना आवर्जून बनवत असतो दिवाळी म्हणजे आपल्यासाठी आनंद चा सण असतो त्या बरोबर छान छान फराळ बनवण्याचाही.

आपण दिवाळीत विविध प्रकारचे फराळ बनवतो पण त्यात चकली (chakli recipe in marathi) नसेल तर फराळ अर्धवट राहत . म्हणून दिवाळीत खास अश्या चकल्या बनवून आपण पाहुण्यांना त्याचा कुरकुरीत आस्वाद घेऊ देऊ शकतो.चकली हा अल्पहार (नास्ता) भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो चकली हि वेगवेगळ्या पिठापासून बनवली जाते .गुजरात मध्ये चकलीला चक्री असं म्हणतात तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मध्ये चकली असं म्हणतात.

दक्षिण भारतात यास “मुरुक्कू” म्हटले जाते. चकली हि गव्हाच्या पिठापासून बनवतात भारतातल्या दक्षिण राज्यात चकली हि तांदूळच्या पिठापासून बनवतात .चकली (chakli recipe ) हि तांदुळ,उडीद डाळ ,चण्याची डाळ यांच्या पिठापासून बनवली जाते ,यावेतिरिक्त इतरही डाळीचा वापर याच्यात करतात .आपण नेहमी घरी चकल्या बनवतो पण त्या बाहेरून आणलेल्या चकल्या सारख्या चवदार नाही बनत किंवा त्या बिघडतात पण आज आपण एक वेगळी चकली रेसिपी (chakli recipe in marathi) बगणार आहोत जी तुम्ही घरी बनवू शकता जी खायला चटपटीत कुरकुरीत चवदार लागते तर चला बगूया कशी बनवायची चटपटीत चकली रेसिपी.

चकली रेसिपीसाठी (chakli recipe) लागणारे साहित्य खालीलप्रमाणे आहे.

चकली साहित्य – ingredients for chakli recipe

चकली पाककृती -chakli recipe in marathi

१ तांदूळ पीठ

१/२ कप बेसन (हरभरा पीठ)

२.५ चमचे तेल किंवा मऊ लोणी

२/३ते ३/४ कप पाणी – आवश्यकतेनुसार

१/४ चमचे हळद

१/२ चमचे अजवाइन

१/२ चमचे जिरे

१/२ ओवा

१ चमचा लाल तिखट

१/२ चमचा हिंग

१ चमचे तीळ – पांढरा किंवा काळा

तळण्यासाठी तेल

आवश्यकतेनुसार मीठ

चकली बनवण्यासाठी चकलीचा साचा सुद्धा गरजेचा आहे

चकलीसाठी कणिक – chakli recipe in marathi

 • चकली पाककृती ( chakli recipe) बनवण्यासाठी आपल्याला चकली साठी लागणारे कणिक मळून घ्यायचे आहे .
 • कणिक मळण्यासाठी सर्वप्रथम तांदळाचे पीठ आणि हरभरा पीठ एका भांड्यात काढून घ्या.
 • आता त्यात जिरे, तीळ, हळद, तिखट, हिंग आणि मीठ घाला. नंतर हे सर्व चमच्याने एकत्र मिसळून घ्या.
 • आता एका छोट्या वाटीत किंवा लहान पॅनमध्ये लोणी किंवा तेल गरम करा.
 • आता हे गरम केलेलं तेल किंवा लोणी आपण तयार केलेल्या पिठाच्या मिश्रणात घाला.
 • आता एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा पाण्याला उकळी येईपर्यंत पाणी गरम करा.
 • हे गरम पाणी चकलीसाठी तयार केलेल्या पिठाच्या मिश्रणात काही प्रमाणात घाला. चमच्याने चांगले मिसलून घ्या.
 • आवश्यकतेनुसार गरम पाणी पिठात मिसळत जा आणि छान कणिक मळून घ्या. पीठ थोडं घट्ट मळा
 • मळून घेतलेल्या पिठाला आता झाकण ठेऊन अर्था तास (३० मिनिटे) बाजूला ठेवा
 • कधी पण चकलीच पीठ मळून झाल्या नंतर लगेच चकल्या करायला सुरुवात नका करू पिठाला चांगलं मुरू द्या.

चकली कशी बनवायची – how to make chakli recipe

चकली बनवतानी चकली साठी बेस्ट टीप एकदा बगून घ्या जेणेकरून चकल्या बिघडणार नाही .

 • आता आपले चकली रेसिपी (chakli recipe in marathi ) लागणारे पीठ तयार आहे. आता आपण लगेच चकली बनवूया.चकली साचा स्वछ धुणून पुसून घ्या .
 • नंतर त्याच्या आकाराचा पिठाचा गोळा बनवा आजूबाजूला थोडं पाणी लावा म्हणजे पीठ साच्याला चिपकणार नाही
 • आता साच्याच झाकण घट्ट लावा आणि चकल्या आकारा मध्ये बनवून घ्या .
 • चकल्या सुकविण्यासाठी लोणीच्या कागदावर किंवा अॅल्युमिनियम फॉइल वापरा जेणेकरून चकल्या चिपकनार नाही आणि काढताना तुटणार नाही व काढने सोपे होईल.
 • चकल्या सुकून झाल्या की आता तुम्ही त्या तलू शकता
 • एका कढईत चकल्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवा . तेल चांगले गरम होऊ द्या तेल गरम झाले की नाही बगण्यासाठी कणिकांचा एक छोटा तुकडा घ्या आणि तो कढईत टाका आणि तेलाचे तपमान तपासा. जर हळूहळू पीठ वर येत असेल तर तेल तयार आहे. जर कणिक तळाशी बसला असेल तर तेल अजूनही थंड आहे. जर पीठाचा तुकडा त्वरेने आणि त्वरीत वर आला तर तेल खूप गरम आहे.
 • चकल्या तळतानि कढईत जास्त चकल्या टाकू नका असं केल्यास चकल्या चांगल्या कुरकुरीत नाही तळल्या जात. चकल्या सोनेरी होई पर्यंत तळा.
 • अशा प्रकारे सगळ्या चकल्या तळून घ्या आणि त्यानंतर त्यातील तेल काढून टाकण्यासाठी त्यांना कागदाच्या टॉवेल्सवर काढून टाका. नंतर त्या एका नीट हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा जेनेकरुन त्या भरपूर दिवस कुरकुरीत राहतील चिमनार नाही .
 • चकलीला चहा सोबत स्नॅक म्हणून सर्व्ह करा.
 • तुम्ही नवीन काही तरी म्हणून मुलांच्या डब्याला कधी कधी चकली पण देऊ शकता

चकली बनवण्यासाठी काही खास टीप – tips for chakli recipe

टीप : जर तुम्ही गव्हाच्या पिठापासून चकली बनवत असाल तर त्यात तेलाचे किंवा लोनीचे मोहन घालू नका आपण असं केलं तर चकल्या विरघळतात आणि तुटतात.

जर तुम्ही चकल्या ह्या तांदळाच्या पिठापासून बनवत असाल तर लक्षात ठेवा तांदळाच्या पिठात चिकटपणा नसतो त्यामुळे चकली तुटण्याची भीती असते म्हणून चकल्या आरामात कराव्यात

चकलीसाठी लागणारे पीठ थोडे वाफवून घेतले की चकली जास्त कुरकुरीत होतात.

चकलीसाठी पीठ मळत असंतानी मिठाचे प्रमाण नेहमी चाखून पहा जेणेकरून कमी झाल्यास टाकता येऊल किंवा जास्त झाल्यास पीठ घालता येईल

जर तुम्ही साच्यामध्ये चकली बनवत असाल आणि ती गोल न बनता सारखी सारखी तुटत असेल तर याचा अर्थ चकलीच्या पिठात पाणी कमी पडलय पिठात ओलावा नाहीय त्याठी पिठात 1,2 चमचा पाणी घालून पीठ परत मळून घ्या.

कधी कधी चकलीच्या पिठात पाणी जास्त झालं की चकलीचा आकार बिघडतो अशा वेळी आपण त्यात थोडे पीठ घालू शकता

चकल्या तेलात घातल्यावर विरघळत असतील तर -पिठात मोहन जास्त झाले तर – थोडी भाजणीची उकड काढावी (तेल न घालता), आधी मळलेल्या पिठाचा थोडा भाग घेऊन त्यात मिक्स करावे आणि त्याच्या चकल्या करून पाहाव्यात.

चकल्या नेहमी मध्यम आचेवर तळाव्या मोठ्या किंवा छोट्या आचेवर नाही तुम्ही जर चकल्या थंड आचेवर तळल्या तर चकल्या मध्ये खूप तेल जाऊन बसते आणि चकल्या तेलगट होतात.

चकली रेसिपी साठी पीठ मळत असतानी नेहमी कोमट किंवा गरम पाणी वापरा थंड पाणी नाही.

चकलीला जास्त मासलेदार बनवण्यासाठी तुम्ही त्यात लसूण किंवा हिरवी मिरची पेस्ट घालू शकता.

चकल्या चांगल्या सोनेरी तळल्या कि चकली जास्त काळ टिकून राहते म्हणून नेहमी चकली चा रंग लालसर होई पर्यंत तळा.

चकलीला लागणारी भाजणी साहित्य नेहमी चांगले भाजून घ्या .कमी भाजले कि चकल्या नरम होतात .

हि चकली रेसिपी (chakli recipe)तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि काही बदल करायचा असल्यास कंमेन्ट मध्ये आम्हाला लिहून पाठवा आंम्ही या चकली रेसिपी मध्ये त्याला update करू.

Leave a Comment