Birthday Wishes in Marathi | वाढदिवस शुभेच्छा । BEST Birthday Wishes

Published by Uma on

Birthday Wishes in Marathi

वाढदिवस शुभेच्छा (Birthday Wishes in Marathi) : वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप स्पेसिअल दिवस असतो. आणि आपण दिलेल्या शुभेच्छा त्याचा दिवस आणखीच खास बनवत असतात. आपल्या मित्र मैत्रीणी नातेवाईक यांचा वाढदिवस असेल तर त्यांना काय शुभेच्छा द्यायच्या हा आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न असतो.आज काही अप्रतिम वाढदिवस शुभेच्छा (BEST Birthday Wishes) संग्रह तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत.ज्यामुळे तुम्ही दिलेल्या वाढदिवस शुभेच्छा त्या व्यक्तीसाठी खूप खास असतील.

Birthday Wishes in Marathi | वाढदिवस शुभेच्छा । BEST Birthday Wishes

चेहऱ्यावर हास्य राहो सदा
सुख मिळो जोडुनी हात
आजच्या वाढदिवसाच्या दिनी
आनंदाची व्हावी सुरवात

देवाने इतकं दिलाय भरून
अजून काय देऊ शुभेच्छा
या वाढदिवशी सुख वाढो
हीच मनःपूर्वक सदिच्छा

आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या
शिखरे उंच सर तुम्ही करावी
आजच्या या वाढदिवसाला
उंच भरारी आकाशी भरावी

आपल्या वाढदिवसाला
आनंदाचा वाहो झरा
दुबळ्यांची सेवा घडो
त्यातच आनंद खरा

आपला वाढदिवस दरवर्षी
असाच नेमाने येत राहो
आपला आनंदी चेहरा
असाच आम्ही पाहो

आपला वाढदिवस दरवर्षी
असाच नेमाने येत राहो
आपला आनंदी चेहरा
असाच आम्ही पाहो

वाढदिवसाला काय द्यावी भेट
कळत नव्हते काही
बस देवाकडे एकच आहे मागणे
तुला जीवनात भेटो सर्व काही


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *