भाताचे वडे रेसिपी : Bhatache Vade Recipe

Published by Uma on

Bhatache Vade Recipe

भाताचे वडे रेसिपी (Bhatache Vade Recipe) : बऱ्याच वेळा आपल्याला घरात नाश्त्यासाठी बनवायला काहीच नसत अशावेळी आपल्याला काय बनवावं काळात नाही. नेहमी शिळा उरलेला भात असेल तर आपण त्याचा फोडणीचा भात बनवतो आणि खायला देतो.पण तो फारसा सगळ्यांना आवडत नाही.आज आपण खास शिळ्या भातापासून अतिशय चविष्ट रेसिपी बनवणार आहोत.ती म्हणजे भाताचे वडे (Bhatache Vade Recipe) कोणी कोणी याला भाताचे कटलेट्स सुद्धा म्हणत.चला तर सुरु करूया आपली आगळीवेगळी रेसिपी भाताचे वडे रेसिपी.

साहित्य :-

  • 1 कप भात (शिळा किंवा ताजा कोणताही चालेल )
  • 1 टिस्पून धने पावडर
  • 1 टिस्पून जिरे पावडर
  • 1 टिस्पून गरम मसाला
  • 1/4 चमचा हळद
  • 1 चमचा लाल तिखट
  • चवीपुरते मीठ
  • चिमूटभर हिंग
  • 7-8 लसूण पाकळ्या व 1 इंच आले वाटून
  • मूठभर कोथिंबीर बारीक चिरून
  • 1/2 कप बेसन
  • 2 टेबलस्पून कॉर्न फ्लॉवर
  • 1 वाटी रवा
  • तळण्यासाठी तेल

कृती :-

  1. एका बाउल मध्ये भात घेऊन त्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, हळद, लाल तिखट, मीठ, हिंग, आलं लसूण पेस्ट, कोंथिबीर घालून मिक्स करावे.
  2. नंतर भातात मावेल इतके बेसन चमचाने घालावे. मळून अंदाजे पीठ घालावे. व त्यात 2 टेबलस्पून कॉर्न फ्लॉवर घालून चांगले मळून घ्यावे.
  3. भाताचे एक सारखे गोळे करावेत. तळहातावर थोडे चपटे करून ताटाला तेल लावून त्यावर लावून ठेवावेत.
  4. कढईत तेल तापायला ठेवावे. तेल तापल्यावर एक वडा दोन्ही बाजूनी रव्यात घोळवून तळावा. एका वेळी 3-4 वडे तळावे.
  5. लाइट ब्राऊन रंग आल्यावर तेलातून काढून ठेवावे.
  6. गरम गरम टोमॅटो सॉस बरोबर खायला द्यावेत.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *