Bhadang Recipe in Marathi
Bhadang Recipe in Marathi

भडंग बनवण्यासाठी साहित्य :-

  • २५० ग्रॅम चुरमुरे
  • १ चमचा लाल तिखट
  • १ चमचा हळद
  • १ चमचा धने, जिरे पावडर
  • १/४ चमचा दालचिनी पावडर
  • १ चमचा पिठी साखर
  • १/२ चमचा आमचूर  पावडर
  • ५-६ लसुन पाकळी
  • १/२ कप शेंगदाणे
  • १/४ कप काजू
  • १/४ कप, वाटी खोबरेचे चिरलेले पातळ काप
  • ८-१० कढीपत्ता
  • १/४  कप तेल
  • मीठ चवीनुसार

कृती :-

  • एका कढईत  तेल गरम करा त्यात कढीपत्ता आणि हळद घाला .
  • नंतर त्यात शेंगदाणे ,वाटी खोबरेचे काप आणि काजू घाला .
  • नंतर त्यात लसुन बारीक करून घाला आणि सर्व मिक्स करून लाईट ब्राऊन रंगावर तळून घ्या. नंतर तेल थंड होऊ ध्या.
  • चुरमुरे, लाल तिखट, धने, जिरे पावडर, दालचिन पावडर, आमचूर पावडर, मीठ घाला आणि सर्व एका बाजूला परातीत मिक्स करून घ्या.
  • पिठीसाखर घाला.
  • नंतर हे मिश्रण कढईच्या मिश्रणामध्ये घालून एकसारखे मिक्स करून हलवा.
  • गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.
  • स्वादिष्ट भडंग तयार आहे. मग आपणास हव असेल तर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कोंथिबीर घालून सर्व्ह करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here