Batata Vada Recipe
Batata Vada Recipe

बटाटा वडा ( Batata Vada Recipe ) : आज आपण मुंबई स्पेसिअल वडापावचा बटाटा वडा रेसिपी (Batata Vada Recipe) बगणार आहोत . आपल्या सगळ्यांना वडापाव खूप आवडतो. सगळ्यात जास्त गंमत असते ती वडापाव मधील बटाटा वडा तो चविष्ट असेल तर वडापाव खाण्याची खरी मज्जा असते.

साहित्य  :-

  • अर्धा किलो बटाटे
  • १ वाटी डाळीचे पीठ
  • १ टे.स्पून तिखट
  • मीठ
  • पाव चमचा हळद
  • चिमूटभर सोडा
  • २ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन
  • १ गड्डी लसून सोलून
  • १ इंच आले
  • ६-७ हिरव्या मिरच्या
  • ८-१० कढिलिंब
  • १ लिंबाचा रस
  • कोंथिबीर बारीक चिरून
  • १/२ टेबलस्पून मोहरी
  • चिमूटभर हिंग
  • तळण्याकरता तेल

कृती :-

  • बटाटे वडा (Batata Vada Recipe) बनवण्यासाठी बटाटे उकडून, साल काढून सुरीने बारीक चिरावेत.
  • आले, लसून,मिरच्या बारीक वाटून बटाट्याच्या फोडींवर घालाव्यात. लिंबाचा रस, मीठ व कोंथिबीर घालावे.
  • २ चमचे तेलाची, मोहरी, हिंग,हळद,कढिलिंब घालून फोडणी करून बटाट्याच्या सारणावर घालावी.
  • सारण हलक्या हाताने कालवून त्याचे सारखे गोळे करावेत.तळहातावर थोडे चपटे करून ताटाला तेल लावून त्यावर लावून ठेवावेत.
  • डाळीचे पीठ, मीठ, तिखट,हळद घालून सरसरीत भिजवावे.त्यात चिमूटभर सोडा व २ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालून नीट कालवून घ्यावे.
  • पसरट कढईत तेल तापायला ठेवावे. तेल तापल्यावर एक एक वडा पिठात बुडवून तळावा. अशा रीतीने सर्व वडे तळावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here