Batata Vada Recipe बटाटा वडा

बटाटा वडा ( Batata Vada Recipe ) : आज आपण मुंबई स्पेसिअल वडापावचा बटाटा वडा रेसिपी (Batata Vada Recipe) बगणार आहोत . आपल्या सगळ्यांना वडापाव खूप आवडतो. सगळ्यात जास्त गंमत असते ती वडापाव मधील बटाटा वडा तो चविष्ट असेल तर वडापाव खाण्याची खरी मज्जा असते.

साहित्य  :-

 • अर्धा किलो बटाटे
 • १ वाटी डाळीचे पीठ
 • १ टे.स्पून तिखट
 • मीठ
 • पाव चमचा हळद
 • चिमूटभर सोडा
 • २ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन
 • १ गड्डी लसून सोलून
 • १ इंच आले
 • ६-७ हिरव्या मिरच्या
 • ८-१० कढिलिंब
 • १ लिंबाचा रस
 • कोंथिबीर बारीक चिरून
 • १/२ टेबलस्पून मोहरी
 • चिमूटभर हिंग
 • तळण्याकरता तेल

कृती :-

 • बटाटे वडा (Batata Vada Recipe) बनवण्यासाठी बटाटे उकडून, साल काढून सुरीने बारीक चिरावेत.
 • आले, लसून,मिरच्या बारीक वाटून बटाट्याच्या फोडींवर घालाव्यात. लिंबाचा रस, मीठ व कोंथिबीर घालावे.
 • २ चमचे तेलाची, मोहरी, हिंग,हळद,कढिलिंब घालून फोडणी करून बटाट्याच्या सारणावर घालावी.
 • सारण हलक्या हाताने कालवून त्याचे सारखे गोळे करावेत.तळहातावर थोडे चपटे करून ताटाला तेल लावून त्यावर लावून ठेवावेत.
 • डाळीचे पीठ, मीठ, तिखट,हळद घालून सरसरीत भिजवावे.त्यात चिमूटभर सोडा व २ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालून नीट कालवून घ्यावे.
 • पसरट कढईत तेल तापायला ठेवावे. तेल तापल्यावर एक एक वडा पिठात बुडवून तळावा. अशा रीतीने सर्व वडे तळावेत.

Leave a Comment