Batata Palak Bhaji Easy Recipe Marathi – बटाटा पालक मिक्स भाजी | Maharashtrian Recipe

Published by Uma on

आज आपण बगणार आहोत बटाटा पालक मिक्स भाजी ( Batata palak bhaji recipe in Marathi) बनवण्याची सोप्पी पद्धत. हि पाक कृती (recipe) पौष्टीक आणि निरोगी आहे जी आपण मुलांना त्यांच्या डब्यात पण देऊ शकतो बटाटा हा मुलांचा आवडता असतो म्हणून त्या सोबत ते पालक पण खातात. चला तर बगूया बटाटा पालक भाजी कशी बनवायची.

बटाटा पालक भाजीसाठी लागणारे साहित्य – ( Batata Palak Bhaji Easy Recipe )

२ चमचे तेल

१ टीस्पून जिरे बियाणे

१ कप बारीक चिरलेला कांदा

१/२ कप टोमॅटो पासा

१ चमचा आले लसूण पेस्ट

१/4 टीस्पून हळद

१ चमचा मिरची पावडर

१ चमचा गरम मसाला

१/२ टीस्पून धणे पूड

1 कप पालक पाने बारीक चिरून घ्यावी

1 मोठा बटाटा उकडलेला

बटाटा पालक बनवण्याची पद्धत – ( How to make Batata Palak Bhaji Recipe )

  • सगळ्यात पहिले बटाटा(batata) उकडून घ्या उकडलेले बटाटा सोलून त्याचे लहान चौकोनी तुकडे करा.
  • नंतर पालक निवडून त्याची पाने धुऊन घ्या आणि चिरून घ्या.
  • त्यानंतर कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे घाला आणि जिरे चांगले तडतडले कि त्यात नंतर चिरलेला कांदा घाला आणि कांदे हलका सोनेरी रंग येईस्तोवर शिजवा.
  • त्यानंतर त्यात आले लसूण पेस्ट घालून चांगले मिक्स करावे
  • नंतर धणे पूड, गरम मसाला, तिखट, हळद घाला आणि चांगले मिक्स करून घ्या.
  • आणि हे सगळे मसाले 2 मिनिटे शिजवा.
  • नंतर टोमॅटो घालून मिक्स करावे.आणखी 2 मिनिटे शिजवा.
  • आता त्यात बारीक चिरलेली पालक पाने घाला, चांगले मिक्स करावे आता बटाटा टाका चवीनुसार मीठ घाला आणि चांगले एकत्र करा.
  • आता त्यावर झाकण ठेवा आणि 3 ते 4 मिनिटे शिजवा. आणि नंतर गॅस बंद करा .अश्या प्रकारे आपली चविष्ट बटाटा पालक भाजी (batata palak bhaji recipe)तयार आहे.
  • चपातीबरोबर गरमागरम सर्व्ह करा


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *