Akrura Neu Nako Madhava Lyrics। अक्रुरा नेऊ नको माधवा
नेऊ नको माधवा, अक्रुरा नेऊ नको माधवा क्रूर अक्रुरा नकोस नेऊ आनंदाचा ठेवा
खेळगडी तो गोपाळांचा
गिरिधारी रे भक्तजनांचा
धुंद रात्र रे स्वप्नी उरली
ऐकू दे मज मंजुळ पावा
नकोस नेऊ बालमुकुंदा
वेडी होइल गौळण राधा
तुला विनविती नंद-यशोदा
नेऊ नको माधवा