Aai Mhnje| aai marathi kavita – आई म्हणजे…..

Published by Uma on

Aai Mhnje – आई म्हणजे

आई म्हणजे…..aai marathi kavita

आई म्हणजे…..खरचं आई असते. आईची महती खूप असते ती शब्दात मांडता नाही येत.पण कोणीतरी आई बद्दलच आपल्या आयुष्यातील महत्त्व या आई म्हणजे….(aai mhnje) मराठी कवित्यामधून ( aai marathi kavita) व्यक्त केलंय .आई म्हणजे.. म्हणजे आत्मा आणि म्हणजे ईश्वर या दोघांचा सुरेख संगम म्हणजे आई. आई या दोन शब्दात नभाईतके सामर्थ्य आहे आईच्या ममतेपुढे साऱ्या जगाचे प्रेम फिके .आई हि आपल्या सगळ्यांचा पहिला गुरु असते .आई हि सौख्याचा सागर , प्रीतीचे माहेर, अमृताची धार असते.आई वर आपण खूप कविता (aai marathi kavita) ऐकतो,पण ही आईवरील हि मराठी( marathi kavita) कविता आई म्हणजे…. खरच खूप सुंदर लिहिलीय.आई म्हणजे काय असते…?

आई म्हणजे काय असते आई म्हणजे दुधावरची साय असते गोठ्यातल्या वासराची गाय असते

Aai | aai marathi kavita – आई म्हणजे…..

आई साठी काय लिहू

आई साठी कसे लिहू

आई साठी पुरतील एवढे

शब्द नाहीत कोठे

आई वरती लिहीण्याइतपत

नाही माझे व्यक्तिमत्व मोठे

जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर

जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर

जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी

जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी

आई तू उन्हामधली सावली

आई तू पावसातील छत्री

आई तू थंडीतली शाल

आता यावीत दुःखे खुशाल

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस

आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी

आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी

आई म्हणजे आरतीत वाजवावी

अशी लयबध्द टाळी

आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी………

आई म्हणजे…..aai marathi kavita हि मराठी कविता( Marathi kavita) तुम्हाला कशी वाटली आम्हाला कंमेन्ट करून नक्की सांगा.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *