20 Best Marathi Ukhane for Female and Male | मराठी उखाणे स्त्री आणि पुरुषांसाठी

0
22

20 Best Marathi Ukhane for Female and Male नमस्कार मित्र मैत्रिणींनो आता लग्नाचा सीजन सुरु आहे .त्यामुळे लग्न जमलं कि खूप तयारी करावी लागती. त्या सर्व तयारी सोबत आपल्याला अजून एक तयारी करायची असते ती म्हणजे उखाणे. तर आता तुम्हाला वेगळी तयारी करायची गरज नाहीये . आज येथे आपण 20 Best Marathi Ukhane स्त्री आणि पुरुषांसाठी बघणार आहोत.

हे उखाणे अगदी सोपे आहेत त्या मुळे लक्षात पण राहतील , आणि जास्त तयारी करण्याची गरज पडणार नाही. हे 20 Best Marathi Ukhane for Female and Male – मराठी उखाणे स्त्री आणि पुरुषांसाठी म्हणजेच नवरा मुलगा व नवरी मुलगी या दोघांसाठी हे मराठी उखाणे केले आहेत आवडल्यास शेअर करा व आनंद पसरवा.

Best Marathi Ukhane female/ Best Marathi Ukhane for bride – मराठी उखाणे स्त्रियांसाठी

१) ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल……. रावच नाव घेते तुमच्यासाठी स्पेसिअल

२) हिवाळ्यात धुके पडते दाटच दाट, ……. रावांचे नाव घेते, आता सोडा माझी वाट.

३) तळहातावर रचली मेहंदी त्यावर तेलही शिंपडले, …….रावांचे मन मी केव्हाच जिंकले.

४) हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी, …….रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी.

५) तुळशी माते तुळशी माते वंदन करते तुला, … ……. रावांचे नाव घेतेअखंड सौभाग्यवती राहू दे मला

६) ईन मिन साडेतीन, ईन मिन साडेतीन, ….राव माझे राजा आणि मी त्यांची Queen.

७) छन-छन बांगड्या छुम-छुम पैंजण, …..रावांचे नाव घेते ऐका सारेजण.

८) जीवनरुपी काव्य, दोघांनी वाचावी, . ….रावांची साथ मला जन्मोजन्मी मिळावी.

९) छत्रपती शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्तीपेक्षा युक्तीने, …..रावांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने.

१०) माहेरी साठवले, मायेचे मोती, ….. रावांचे नाव घेऊन जोडते नवी नाती.

Best Marathi Ukhane male/ Best Marathi Ukhane for groom पुरुषांसाठी स्मार्ट मराठी उखाणे

१) सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण, ….. नाव घेतो ऐका सर्वजण.

२) नील नभाच्या तबकात नक्षत्राचा हार, ……रावांचा स्वभाव मारच उदार

३) शिक्षणाने विकसित होते संस्कारीत जीवन, ….रावांच्या संसारात राखी सर्वांचे मन.

४) “पतीव्रतेचे व्रत घेऊन नम्रतेने वागते, …… नाव घेताना आशीर्वाद मागते

५) “राजहंस पक्षी शोभा देतो वनाला, ….चे नाव घेता आनंद होतो मनाला.

६) “मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ….चं नाव घेतो नीट लक्ष ठेवा.”

७) नील नभाच्या तबकात नक्षत्राचा हार, …… स्वभाव फारच उदार.

८) तळहातावर मेहंदी रचली त्यावर तेलही शिंपडले, … मन मी केव्हाच जिंकले.

९) नाव घ्या नाव घ्या असा घालू नका वाद, ……… नाव घेऊन मिळवीन सगळ्यांची दाद.

१०) कामाची सुरुवात होते श्रीगणेशापासून, .. ….. नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून.

वरील Best marathi ukhane female / Best marathi ukhane for bride वधू Best marathi ukhane male / Best marathi ukhane for groom सर्व उखाणे तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणीना पाठवायला विसरू नका धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here