हि गोष्ट तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल

Published by Uma on

तुमच्या आयुष्याची किंमत याच्या वरून ठरवली जाते ,की तुम्ही स्वतःला कुठे ठेवता?

एकदा एका मुलाने त्याच्या वडिलांना विचारलं बाबा माझ्या आयुष्याची किंमत काय आहे? तेव्हा त्यावर त्याचे वडील म्हणाले तुला खरंच तुझ्या आयुष्याची किंमत माहिती करुन घ्यायची असेल तर, मी तुला एक दगड देतो तो तू रस्त्यावर घेऊन बस आणि कोणी तुला कितीला आहे याची किंमत किती आहे असं विचारलं तर फक्त तुझे दोन बोट वरती करायचे काही बोलायचं नाही .मुलगा म्हणाला ठीक आहे त्याने तो दगड घेतला आणि तो रस्त्यावर जाऊन बसला आणि कोणी येण्याची वाट बगू लागला खुप वेळ झाला पण कोणी आलं नाही खूप वेळा नंतर एक म्हातारी तिथे आली आणि तिने मुलाला विचारलं ह्या दगडाची किंमत काय आहे मुलाने फक्त 2 बोट वरती केले म्हातारी म्हणांली 20 रु ? चालेल मी हा दगड 20 रु घेईल मुलगा दगड वापस घेऊन त्याच्या वडिलांकडे गेला आणि सांगितलं ह्याची किंमत 20 रु आहे .

वडील म्हणाले आता हा दगड घेऊन तू बाजारात जा आणी तिथे काय किंमत भेटते बग हा बाजारात गेला तिथे जाऊन बसला एका माणसाची याच्या जवळ असलेल्या दगडाला पाहिलं आणि विचारलं याची किंमत काय आहे मुलाने फक्त दोन बोट वरती केले माणूस म्हणाला 20 हजार? ठीक आहे मी हा दगड 20 हजार मध्ये घ्यायला तयार आहे . त्या मुलाने दगड विकला नाही आणि परत वडिलांकडे गेला आणि म्हणाला बाजारात याची किमत 20 हजार आहे मुलाला काय होतय कळत नव्हतं आता त्याचे वडील म्हणाले आता तू शेवटचं ह्याला घेऊन मुसीम मध्ये जा हा तो दगड घेऊन तिथे बसला कोणी येन्याची वाट बगू लागला तेव्हड्यात एका म्हाताऱ्या माणसाची नजर यांच्याकडे आली आणि त्याने दगड पहिला तो धावत याच्या कडे आला आणि दगड हिसकावून घेतला आणि विचारू लागला तुला हा दगड कुठे भेटला मी माझ सगळं आयुष्य हे शोधण्यात घालवालय सांग याच्या किंमत काय पाहिजे तुला मुलाने दोन बोटे वरती केली माणूस म्हणाला 2 लाख ठीक हे मी द्यायला तयार आहे आता मुलाला हेय बगून खूप धक्का बसला तो त्याच्या वडिलांकडे गेला आणि म्हनाला याची किंमत तर 2 लाख आहे .

त्याचे वडील म्हणाले आता कळली का तुला तुझ्या आयुष्याची किंमत आता तुला ठरवायचं कि तुला 20 रु चा दगड बनायच आहे की 2 लाखाचा .

आयुष्यात अशे खूप लोक असतात जे तुमच्यावर खूप प्रेम करतात त्याच्या साठी तुम्ही सगळं काही असता .

आणि काही अशे पण असता जे तुम्हाला फक्त एक वस्तू म्हणून उपयोग करतील…

आता हे तुम्हाला ठरवायचंय तुमच्या आयुष्याची किंमत काय असणार हे……..


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *