स्पेशल मुंबई वडापाव रेसिपी – Vada Pav Recipe in Marathi

64
Mumbaistyle Vadapav
स्पेशल मुंबई वडापाव रेसिपी - Vada Pav Recipe in Marathi

Vada Pav Recipe in Marathi मुंबईचे नाव तोंडात येताच आपल्याला तिथल्या बऱ्याच प्रसिद्ध गोष्टीची आठवण येते ,त्यापैकी मुंबईतील एल प्रसिद्ध गोष्ट आठवते ती म्हणजे स्पेशल मुंबईचा वडापाव!! आणि मुंबईत सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थात वडापाव एक नंबरला आहे.आपण मुंबईला गेला असाल किंवा राहत असाल तर आपण कधीतरी वडापावची चव घेऊन पहिली असेलच. कमी पैशांमध्ये पोटाची खळगी भरणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये वडापावचा समावेश होतो.मुंबईत काही लोक तर फक्त वडापाव वर आपले जीवन जगतात.आज आपण स्पेसिअल मुंबई वडापाव रेसिपी (Vada Pav Recipe in Marathi ) बगणार आहोत .

साहित्य(ingredient for Vada Pav Recipe in Marathi ) :

साहित्य:

१) ६ पाव

२) ३ उकडलेले बटाटे

३) एक कप बेसन (१५० gm )

४) मीठ (चवीनुसार)

५) १/२ चमचा लाल मिरची पावडर

६) १ चमचा धना पावडर

७) १ चमचा हळद

८) १ चमचा मोहरी

९) ७-८ कढीपत्त्याचे पाने

१०) १ चमचा अद्रक+लहसून+मिरची पेस्ट

११) चुटकीभर हिंग

१२) १ चमचा लिंबाचा रस

१३) वडे तळण्यासाठी तेल

कृती :

step १) आता वडे तळण्यासाठी आपल्याला बेसनच मिश्रण तयार करून घ्यायचं आहे.त्यासाठी प्रथम एका बाउल(वाटी) मध्ये एक कप बेसन (१५० gm ) घ्या .त्यात आता एक चमचा हळद ,चिमूटभर हिंग,एक चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घाला.

step २) हे मिश्नण चांगलं एकत्र करून घ्या त्यानंतर यात हळू हळू पाणी घाला आपल्याला वड्यासाठी बेसनच मिश्रण खूप पातळ नाही बनवायचं मिश्रण थोडं घट्टच बनवायचं पण खूप जास्त घट्ट पण नाही .पाणी टाकताना बेसन मिश्रणाला सारखं एकत्र करत राहा जेणेकरून त्यामध्ये गाठी राहणार नाही .

step ३) मिश्रण तयार झाल्यावर त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला यामुळे बेसन थोडस फुलायला मदत होते आणि वड्यांमधे कुरकुरीतपणा येतो.आता वडे बनवण्यासाठी बेसनच मिश्रण आपल्याकडे तयार आहे . ते मिश्रण बाजूला ठेऊन आपण आता वड्यामध्ये लागणाऱ्या मसाल्याची तयारी करूया .

step ४) मसाला तयार करण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर पॅन किंवा कढई ठेवा.पॅन गरम झाल्यानंतर त्यात २ मोठे चमचा भरून तेल टाका तेल चांगल गरम होऊ द्या .

step ५) तेल चांगलं गरम झालं कि त्यात एक चमचा मोहरी घाला मोहरी चांगली तडतडू द्या त्यानंतर त्यात कढीपत्त्याची ७-८ पाने घाला त्याचा सुवास यायला सुरु झाला कि ,त्यात एक चमचा अद्रक +लहसून +मिरची वाटण (पेस्ट ) घाला. या सगळ्यांना छोट्या गॅसवर १-२ मिनिटे हलका रंग येईपर्यंत होऊ द्या .

step ६) त्यानंतर त्यात उकडलेले बटाटे चुरा करून घाला त्यांना चांगले एकत्र करून घ्या आता त्यात एक चमचा हळद,एक चमचा मिरची पावडर ,एक चमचा धना पावडर,बारीक चिरलेली कोथम्बीर आणि चवीनुसार मीठ टाका व परत चांगले एकत्र करून घ्या. १-२ मिनिटे चांगले होऊ द्या व गॅस बंद करा .

step ७) आता आपल्याकडे मसाला तयार आहे . मसाला थंड होण्यासाठी ठेऊन द्या मसाला थंड झाल्यानंतर तो हाताने बारीक करून घ्या कुठे बटाट्याचे मोठे तुकडे राहू नाही म्हणून त्यानंतर सर्व मसाल्यांचे हाताने छोटे छोटे गोळे (वडे ) बनून घ्या .

step ८) आता वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवा .तेल चांगले गरम होऊ द्या आपण जर तेल चांगलं गरम नाही होऊ दिल तर वडे खाली चिकटतात.आता तेल गरम झाले कि सगळे वडे छान गोल्डन ब्राऊन रंग येई पर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या.

step ९) आता आपले वडे तयार आहे.वडापाव सर्व्ह (वाढण्यासाठी ) करण्यासाठी पावला तिखट किंवा गोड चटणी लावून घ्या त्यात गरम गरम वडा घाला. गरम गरम वडापावचा स्वाद घ्या .

step १०)अशाप्रकारे आपला स्पेशल मुंबई वडापाव रेसिपी – Vada Pav Recipe in Marathi तयार आहे.आता गरम गरम वडापावचा स्वाद तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा सॉस सोबत घेऊ शकता .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here