Sant Tukaram Information in Marathi
Sant Tukaram Information in Marathi

संत तुकाराम महाराज माहिती : Sant Tukaram Information in Marathi

जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा ! देव तेथेची जाणावा ! असा अभंग जनसामान्यात पोहोचवून ईश्वर भक्तीचा मार्ग दाखविणारे संत म्हणजे संत तुकाराम (Sant Tukaram Information in Marathi).

संत तुकाराम महाराज थोडक्यात माहिती :

  • पूर्ण नाव : तुकाराम बोल्होबा अंबिले
  • जन्म : १ फेब्रुवारी १६०७
  • जन्मस्थान : पुणे
  • आईचे नाव : कनकाई
  • वडिलांचे नाव : बोल्होबा
  • पत्नीचे नाव : जिजाई
  • भावंडे : सावजी , कान्होबा

संत तुकाराम महाराज माहिती : Sant Tukaram Information in Marathi

• महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते.असाच महान भूमीवर अनेक संत होऊन गेले. इ. स. सतराव्या शतकातील संत तुकाराम महाराज ज्यांनी आपल्या ज्ञानाने व भक्तीने समाज प्रबोधन केले.त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १६०७ मध्ये पुणे जिल्ह्यातील देहू या गावी झाला .

• संत तुकाराम यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले असे होते.त्यांच्या आईचे नाव कनकाई होते,तर वडिलांचे नाव बोल्होबा होते. त्यांना दोन भावंडे होती.सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता .

बोल्होबा आणि कनकाई यांचे मधले चिरंजीव संत तुकाराम महाराज होते. लहानपणापासून संत तुकाराम महाराजांवर घराची जबाबदारी होती. मोठा भाऊ हा थोडा विरक्त स्वभावाचा होता. सावजीने तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी घर सोडले होते आणि लहान भाऊ लहान असल्यामुळे घरची जबाबदारी संत तुकाराम महाराजांनी स्वीकारली होती.

• पहिली पत्नी मरण पावल्यामुळे संत तुकाराम महाराज यांनी दुसरा विवाह केला.संत तुकाराम महाराज यांचा दुसरा विवाह पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई यांच्याशी झाला होता. भागीरती, काशी, नारायण आणि महादेव अशी चार मुले महाराजांना होती.

• पण काही आजारामुळे यातील दोन मुले मरण पावली.तसेच महाराज १५-१६ वर्षाचे असतांना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले.त्यांचा मोठा भाऊ पण मरण पावला.अशा अनेक दुःखांचा त्यांना सामना करावा लागला होता.

•  संत तुकाराम महाराज याना ‘तुकोबा’ असंही म्हणले जात असे.त्यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मुळ पुरूष विठठलभक्त होते. तुकाराम महाराजांना संसार असूनही ते परमार्थाकडे वळले.त्यांनी विठ्ठलावर तसेच समाजावर अनेक उपदेशपर अभंग, कीर्तने रचली.

अभंग रचना करणे हेच संत तुकारामांचे महाराजांचे मुख्य वैशिष्ट्य होते.त्यांनी नेहमी स्वतःच्या संसारापेक्षा जगाच्या कल्याणाचा विचार केला. संत तुकाराम महाराज यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यामुळे त्यानी पंढरपूरच्या विठ्ठलाला त्यांचे आराध्य दैवत मानले.

• समाजाचे प्रबोधन करणे तशेच समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम संत तुकाराम महाराज यांनी आपल्या साहित्यातून आणि किर्तनातून केले. संत तुकाराम महाराज याना त्या काळातील लोकसंत म्हणून ओळखले जायचे,कारण त्यांनी गोर गरीब समाजाचा अंधश्रध्देचा पगडा दुर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचे काम संत तुकारामांनी केले.

• सतराव्या शतकात सामाजिक प्रबोधनाची प्रभावी मुहूर्तमेढ संत तुकाराम महाराजांनी रोवली. त्या काळी समाजातील अंधश्रध्दा दूर करून समाजाला अचूक, योग्य दिशा देण्याचे महत्वपूर्ण महान कार्य तुकोबांनी केले स्वतःच्या सुखापेक्षा तुकोबांनी जगाच्या कल्याणाकडे सदैव लक्ष दिले.त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत.

•  संत तुकाराम महाराज यांचा पारंपरिक व्यवसाय हा सावकारी होता.परंतु एकदा दुष्काळ पडला असताना महाराज यांनी गोर गरीबाची त्यांच्याकडे असणारी गहाण कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली आणि सावकाराच्या तावडीतून त्यांना मुक्त केले.

• संत तुकाराम यांना गरिबांविषयी कळवळा होता. माणूसकीची त्यांना जाणीव होती. कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होता. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाबरोबरच गवळणी ही रचल्या.

असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे । अशा प्रकारचे एकापेक्षा एक नितांतसुंदर अभंग महान संत तुकाराम महाराजांनी रचले.संत तुकारामांनी तुकाराम गाथा लिहली, तिच्यामध्ये पाच हजारांवर अभंग आहेत.

लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा ।।

नाही निर्मळ जीवन | काय करील साबण ।।

• अशी अनेक अभंगे त्यांच्या कुशाग्र बुद्धि मत्तेचे दयोतक आहेत त्यांच्या अभंगातील गोडवा अतुलनीय आहे. त्यांच्या अभंगाना स्वतःचा बाज, आगळे सौदर्यं आहे. त्यातील शब्द प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालतात. वार करी संप्रदायाची एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली .

• फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले असे मानले जाते. हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो. तुकाराम महाराजांच्या जीवनपटा वर अनेक पुस्तके, मालिका, चित्रपट प्रसिध्द झाले आहेत.

• आजही मराठी भाषेत सुप्रसिद्ध असलेल्या अनेक म्हणी, वाक्प्रचार, शब्दप्रयोग आपण तुकारामांच्या गाथेतूनच घेतलेल्या आहेत. आजच्या समाजाला संत तुकारामांचे अभंग नवी दिशा देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here