Homemade Ice-cream
Homemade Ice-cream

मे महिना म्हणजे शाळांना सुट्टी, तेव्हा दिवसभर घरी असणा-या मुलांचा मूड फ्रेश करण्यासाठी त्यांना होम मेड (Homemade Ice-cream) आईस्क्रीम्सची ट्रिट द्या. विविध स्वांदाची घरच्याघरी बनवता येणारी आईस्क्रीम्स तुम्ही नक्की करुन पाहा .आपण कुठल्याही पदार्थाच्या चवीसोबत त्याच्या सुरुक्षिततेबाबतही चोखंदळ असतो. त्यामुळे, हॉटेलपेक्षा आपल्या हक्काच्या प्रयोगशाळेत म्हणजेच घरातील किचनमध्ये नव्या रेसिपीज् करुन पहाणा-या उत्साही सुगरणींसाठी घेऊन आलोय थंडगार आईस्क्रीमच्या लज्जतदार रेसिपीज!!

मे हिट, आईस्क्रीमची ट्रिट : Homemade Ice-cream

बदाम कुल्फी


साहित्य-

 • ३ कप दुध
 • १/४ कप ताजा मावा
 • १/२ कप साखर
 • १/२ कप बदामाचे काप
 • २ टि. कॉर्न फ्लॉवर
 • १/२ टि. वेलची पूड
 • चिमूटभर केशर

पाककृती –

१) प्रथम दूध गरम करुन आटवावे.

२) आटवताना ३ ते ४ मिनिटांनी त्यामध्ये साखर घालावी.

३) मिश्रण सतत ढवळत रहावे व दूध साधारण अर्धे होईपर्यंत आटवावे.

४) मावा हाताने मोकळा करुन घ्यावा. दूध घट्टसर झाले की वेलची पूड, केशर, मावा मिसळावा.

५) मिश्रण थोडे गरम करावे व कोमट झाले की कुल्फीपात्रात मिश्रण ओतून फ्रिजरमध्ये सेट होण्यास ठेवावे. थंडगार कुल्फी घट्ट झाली की सर्व्ह करावी.

आंब्याचे आईस्क्रीम


साहित्य-

 • दीड वाटी थंडगार व्हिपिंग क्रिम
 • दोन कप आंब्याचा रस
 • पाऊण वाटी पिठी साखर
 • वेलची पूड

पाककृती-

१) साधरण मध्यम आकाराचे खोलगट काचेचे बाउल घ्यावे व अर्धा तास फ्रिजमध्ये गार करण्यास ठेवावे.

२) गार झालेल्या बाउलमध्ये व्हिपिंग क्रिम घालून ते फेटून घ्यावे.

३) क्रीम थोडे फ्लफी व्हायला लागले, की हळूहळू त्यामध्ये साखर घालून पुन्हा फेटून घ्यावे.

४) आता या मिश्रणात आंब्याचा रस व वेलची पूड घालावी.

५) आता, मिश्रण पुन्हा नीट घोटून घ्यावे.

६) तयार मिश्रण प्लॅस्टिक किंवा स्टिलच्या भांड्यात पसरवून २ तास फ्रिजमध्ये ठेवावे व मिश्रणास मिक्सरमध्ये फिरवावे.

७) साधारण, एक दोनचा असे केल्यावर आईस्क्रीम सेट होण्यास फ्रिजरमध्ये ठेवावे.

द्राक्षाचे आईस्क्रीम


साहित्य –

 • ५०० ग्रॅ. द्राक्षे
 • ५०० ग्रॅ. दही
 • एक पेला साखर
 • अर्धा पेला दूधाची पावडर
 • अर्ध्या लिंबाचा रस
 • पाव पेला क्रीम.

पाककृती –

1) प्रथम द्राक्षे धुवून मिक्सरमध्ये त्याचा पल्प करुन तो गाळून घ्यावा.

2) दही पातळ कपड्यात बांधून दोन तास टांगून ठेवावे.

3) पाणी निथळून गेलेल्या या दह्यामध्ये पिठीसाखर, दुधाची पावडर, लिंबाचा रस व द्राक्ष्यांचा पल्प मिसळावा.

4) हे मिश्रण सेट होण्यास फ्रिजमध्ये ठेवावे. साधारण दोन तासांनी मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.

5) पुन्हा सेट करण्यास ठेवावे व गारेगार आईस्क्रीम सर्व्ह करावे.

अननसाचे आईस्क्रीम


साहित्य –

 • एक अननस
 • दोन वाट्या क्रीम
 • अर्धी वाटी साखर
 • पायनॅपल इसेन्स
 • तीन मोठे चमचे दूधपावडर
 • एक चमचा लिंबाचा रस,

पाककृती-

1)अननसाचे तुकडे करुन त्याचा मिक्सरद्वारे त्याचा पल्प तयार करुन घ्यावा.

2) साखर, दूध पावडर व पल्पचे मिश्रण सेट होण्यास फ्रीजमध्ये ठेवावे.

3) साधारण दोन तासांनी पुन्हा मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.

4) आता, क्रीममध्ये लिंबाचा रस व इसेन्स घालून मिश्रण चांगले फेटून घ्यावे.

5) फेटलेले मिश्रण मुख्य मिश्रणामध्ये घालून एकजीव करुन घ्यावे. आता तयार, आईस्क्रीम सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे

मैत्रिणींनो,तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा तुमच्या कमेन्ट्सद्वारे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here