भडंग बनवण्यासाठी साहित्य :-
- २५० ग्रॅम चुरमुरे
- १ चमचा लाल तिखट
- १ चमचा हळद
- १ चमचा धने, जिरे पावडर
- १/४ चमचा दालचिनी पावडर
- १ चमचा पिठी साखर
- १/२ चमचा आमचूर पावडर
- ५-६ लसुन पाकळी
- १/२ कप शेंगदाणे
- १/४ कप काजू
- १/४ कप, वाटी खोबरेचे चिरलेले पातळ काप
- ८-१० कढीपत्ता
- १/४ कप तेल
- मीठ चवीनुसार
कृती :-
- एका कढईत तेल गरम करा त्यात कढीपत्ता आणि हळद घाला .
- नंतर त्यात शेंगदाणे ,वाटी खोबरेचे काप आणि काजू घाला .
- नंतर त्यात लसुन बारीक करून घाला आणि सर्व मिक्स करून लाईट ब्राऊन रंगावर तळून घ्या. नंतर तेल थंड होऊ ध्या.
- चुरमुरे, लाल तिखट, धने, जिरे पावडर, दालचिन पावडर, आमचूर पावडर, मीठ घाला आणि सर्व एका बाजूला परातीत मिक्स करून घ्या.
- पिठीसाखर घाला.
- नंतर हे मिश्रण कढईच्या मिश्रणामध्ये घालून एकसारखे मिक्स करून हलवा.
- गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.
- स्वादिष्ट भडंग तयार आहे. मग आपणास हव असेल तर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कोंथिबीर घालून सर्व्ह करा.