Skip to content

बाप – Marathi Kavita On Father

Bap kavita – बाप !!

Marathi kavita on Father – बाप.!! आपण बगत आलोय कि प्रत्येक जण आईच गाणं गात असतो आईवर कविता बनते बाबा वर (poem on father) फारश्या कविता नसतात .कोणीच बाबाला दुधावरची साय म्हणत नाही , गोठ्यातली गाय म्हणत नाही आपल्या सगळ्याकडे बापा/ बाबांसाठी ( marathi kavita on father) फारशे शब्द नसतात.लहानपणा पासून आई आपल्याला सांगत असते हे करू नको, ते करू नको केलंस तर बाबा ला सांगेन. ह्या मुळे आपण बाबाला नेहमीच घाबरत असतो आणि बाबा पासून दुरावत चालतो मग आपल्या आयुष्यात आई च फार महत्व होऊन जात आणि आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची वेक्ती( important person of our life) आपली आई होते . बाहेरून आल्या नंतर सगळ्यात पहिले आपण आई ला विचारतो ती घरात असेल तर घर भरलेलं आणि बाबा ( bap kavita ) जर असतील तर मात्र सर्वत्र शांतता पसरते आपण नेहमी शपथ पण आईचीच घेतो बाबा शपथेच्याहि लायकीचा नसतो आपल्या साठी.

आपल्या सगळ्यांसाठी बाबा फक्त आपल्या आणि आडनावाच्या मध्ये असतात बाकी गोष्टी साठी आपल्याला आपली आई प्रिय असते पण आपल्याला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी साठी आपल्या सुखा साठी जो रात्र न दिवस कष्ट करतो न तो बाप असतो ( to bap asto ). आई मात्र माध्यम असते आपल्या सुखाची तरीही कुठेही ह्या बाबा चे गुणगान नसतात.

कुठेही कथेत कांदबरीत हा बाबा मात्र सापडत नाही बाबा वर कविता ( marathi kavita on father ) नाही त्याचे गुणगान नाही. बाबा वर भव्य दिव्य लेखन झालेलं नाही कारण मला वाटत बाप हा असा शब्द आहे की त्याच गुणगान त्याचे कष्ट त्याचा त्याग हा चार ओळीत लिहिण्यासारखा नाही . कुठलाही बाप हा त्याच्या कष्टातुन त्यांच्या मुलांसाठी शून्यातून विश्व निर्माण करत असतो . कुठल्याही बाबाचा स्वभाव हा फणसा सारखा असतो बाहेरून कितीही कठोर असला तरी मध्ये रसाळ प्रेम भरलेलं असत .

अशाच ह्या बाबाच्या रसाळ प्रेमावर बाप कविता ( marathi kavita on father ) आहे ज्यात बापाच्या प्रेमाची,कष्टाची जाणीव आपल्याला करून दिलीय . अशी ही बापावरची bap kavita marathi नक्की वाचा.

बाप – marathi kavita on father

बाप कविता – bap kavita marathi

आईचं गुणगाण खुप केले
पण बिचा-या बापाने काय केले?


बिकट प्रसंगी बापच सदा सोडवी
आपण फक्त गातो आईचीच गोडवी


आईकडे असतील अश्रुंचे पाट,
तर बाप म्हणजे संयमाचा घाट.

आठवते जेवण करणारी प्रेमळ आई
त्या शिदोरीची सोय ही बापच पाही….

देवकी – यशोदेचं प्रेम मनात साठवा
टोपलीतुन बाळास नेणारा वासुदेवही आठवा


रामा साठी कौशल्येची झाली असेल कसरत
पुत्र वियोगाने मरण पावला दशरथ

काटकसर करुन मुलास देतो पौकेटमनी
आपण मात्र वापरे शर्ट-पॅन्ट जुनी


मुलीला हवे ब्युटीपर्लर, नवी साडी
घरी बाप आटपतो बिन साबणाची दाढी

वयात आल्यावर मुले आपल्याच विश्वात मग्न
बापाला दिसते मुलांचे शिक्षण, पोरीचे लग्न

मुलाच्या नोकरीसाठी जिना चढुन लागते धाप
आठवा मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप

जीवनभर मुलांच्या पाठी बापाच्या सदिच्छा
त्यांनी समजुन घ्यावं, हीच माफक इच्छा..!!

डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात

डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात

डोळे वटारून जी प्रेम करते तिला बायको म्हणतात

स्वतःचे डोळे बंद होई पर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात

पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात

हि सुंदर बाप मराठी कविता ( marathi kavita on father ) share करा ना आपल्या सगळ्यांच्या बाबांसाठी ….!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *