जर ….तुमची वाईट वेळ सुरु असेल तर धैर्य ठेवा.

वेळेची एक चांगली गोष्ट असते की ती निघून जात असते..जर वाईट वेळ सुरु असेल तर धैर्य ठेवा आणि चांगली वेळ सुरु असेल तर धन्यवाद करा

एका वेळेची गोष्ट आहे ,एकदा एका राजाजवळ एक सुंदर असा महल होता त्या महालांमध्ये एक फुला झाडांची बाग होती त्यात एक द्राक्षाची ची वेल पण होति त्याला एक माळी सांभाळायचा,पण माळी खूप दिवसा पासून परेशान होता दररोज एक चिमणी यायची अन त्या द्राक्षाच्या वेली वरची चांगली द्राक्षे खायची माळी परेशान झाला होता .असच होत राहील तर या वेलीवरची सगळी द्राक्षे एक दिवस नष्ट होतील त्याने खूप विचार केला आणी राजाला हि गोष्ट सांगायची ठरवली घडत असलेल्या घटनेबद्दल माळी ने सर्व राजाला सांगितले .राजाने माळी ला सांगितले तू चिंता करू नकोस मी काय करायच ते बगतो दुसऱ्या दिवशी राजा त्या वेली जवळ गेला आणि तिच्या पाठी माघे लपून बसला जशी चिमणी आली तशी चतुराई ने राजाने तिला पकडलं चिमनी घाबरली आणि राजाला म्हंटली हे राजन.. मला माफ करा मी तुम्हाला चार ज्ञानाच्या गोष्टी सांगते राजाने ऐकून घ्यायचं ठरवलं राजा म्हंटला पहिली सांग चिमणी म्हणाली आपल्या हातात आलेल्या शत्रूला कधीच सोडायचं नाही राजा म्हंटला दुसरी सांग चिमणी म्हणाली कधीच अशक्य गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. आता राजाला राग येत होता राजा म्हंटला तीसरी गोष्ट सांग पटकन चिमणी म्हणाली होऊन गेलेल्या गोष्टीवर कधीच पश्चाताप करायचा नाही आता राजा चा राग अनावर झाला होता राजा म्हंटला शेवटची गोष्ट सांग नंतर तुझी शिक्षा ठरवतो चिमणी म्हणाली राजन तुम्ही मला खूप घट्ट पकडलय त्या मुळे मला श्वास घेता येत नाही तुम्ही मला थोडास सैल पकडल तर मी चौथी आणि शेवटची गोष्ट सांगेल राजाने चिमणी ला ढील दिली आणि चिमणी भुर्रकन उडून झाडावर जाऊन बसली आणि म्हणाली राजन माझ्या पोटात दोन हिरे आहेत हे ऐकून राजा उदास झाला राजा कडे बगून चिमणी म्हणाली राजन मी तुम्हाला आता चार ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या कि हातात आलेल्या शत्रूला कधी सोडायच नाही तुम्ही मला सोडून दिलं दुसरी सांगितली होती की अशक्य गोष्टी वर विश्वास ठेवायचा नाही तुम्ही ठेवला कि माझ्या या येव्हडूश्या पोटात दोन हिरे आहेत आणि तिसरी होऊन गेलेल्या गोष्टीवर पश्चाताप करायला नाही तुम्ही करताय कि तुम्ही मला का सोडून दिलं.

त्या चिमणी ने त्या चार गोष्टी फक्त राजाला नाही तर आपल्याला पण सांगितल्या खूप वेळेस आपण पण होऊन गेलेल्या गोष्टी बद्दल विचार करत असतो नेहमी भूतकाळात जगत असतो त्या साठी आज पासून वर्तमानात जगायला शिका भविष्यकाळासाठी नियोजन करा तुमच्या स्वप्नांना जगायला शिका .

कारण आयुष्यात जे होऊन गेलेलं असत त्या वर आपला कंट्रोल नसतो …पण पुढे जे होणार आहे ते आपलं आपल्या विचारांनी नक्कीच बदलो शकतो …….म्हणून वर्तमानात जगायला शिका……..!!!!

Leave a Comment