साहित्य :
- ४ ते ५ कैऱ्या,
- अर्धी वाटी चिरलेला गुळ,
- ३ टीस्पून लाल तिखट,
- २ टीस्पून हळद,
- ४ टीस्पून मीठ,
- ३ टीस्पून मेथी दाणे
- ४ टीस्पून मोहरी
- ५ ते ६ टीस्पून तेल
- १ टीस्पून हिंग
- ४ ते ५ लवंग
- ७/८ दालचीनी काड्या
- ९/१० मिरी, पाणी

कृती :
१) कैऱ्या २ तास पाण्यात भिजत घाला. नंतर पाण्यातून काढून कोरड्या करून घ्या.
२) त्याचे तुम्हाला हवे तसे तुकडे करून घ्या.
३) त्यात हळद, मीठ, तिखट, गुळ घाला.
४) तेल मंद आचेवर गरम करा त्यात लवंग दालचीनी मिरे टाकुन तडतडू दया मग त्यात मेथी टाकुन दाणे तडतडू दया आणि मग त्यात मोहरी तडतडवा आणि आच बंद करा मग त्यात हिंग घाला आणि ही फोडनी थंड करा.
५) ही थंड फोडणी कैरीच्या मिश्रणावर ओता.
६) हे लोणच काचेच्या कोरड्या बाटलीत भरुन २ दिवस उन्हात ठेवा.
७) ५/६ दिवसांनी लोणच खाण्यास तयार.
टिप्स :
१) मसाले आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
२) गोडपणा नको असेल तर गुळ घालू नका.
३) ४ दिवसांनी test करा आणि हव असेल तर मसाले add करू शकता.