कांदे पातळ उभे चिरून घ्यावेत . त्यावर मीठ घालून हाताने थोडे कालवून १०-१५ मिनिटे झाकून ठेवावे.
१०-१५ मिनिटांनी कांद्यावर डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ, तिखट, हळद, ओवा, जिरे पावडर, धने पावडर, चार टेबलस्पून तेल गरम करून घालावे आणि चिरलेली कोंथिबीर घालून हलक्या हाताने मिसळावे .
कढईत तेल तापायला ठेवावे व तापलेल्या तेलात कांदा हाताने मोकळा करून वेड्यावाकड्या आकाराची भजी घालावीत व खरपूस तळून काढावीत.
गरम गरम खायला द्यावेत.
टीप :-
ही भजी जरा झणझणीत चांगली लागतात.आवडत असल्यास २-३ मिरच्या बारीक चिरून घालाव्यात.