असावा सुंदर चॉकलेटचा बंगला बालगीत | Asava Sundar Choclatecha Bangla Lyrics in Marathi

पूर्ण मराठी बालगीत चे बोल असावा सुंदर चॉकलेटचा बंगला Asava Sundar Choclatecha Bangla Lyrics Marathi. Songs written by Rachana Khadikar, Yogush Khadikar, Shama Khale.

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला पूर्ण माहिती

  • गीत – राजा मंगळवेढेकर
  • संगीत – मीना खडीकर
  • स्वर – योगेश खडीकर , रचना खडीकर , शमा खळे

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला Lyrics in Marathi | Asava Sundar Choclatecha Bangala

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !

बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल

चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला

किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

Leave a Comment